मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Nawab Malik Hospitalized | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे तुरूंगात कोसळले असून त्यांना जे. जे. रूग्णालयात (Nawab Malik Hospitalized) दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती मलिकांचे वकील कुशल मोरे यांनी विशेष पीएमएलए कोर्टात (Special PMLA Court) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोमवारी दुपारी कारागृहात कथितरित्या कोसळल्यानंतर नवाब मलिक यांना जे. जे. रुग्णालयात (J. J. Hospital) हलवण्यात आले असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितले. मंत्री नवाब मलिकांची प्रकृती ठिक नसल्याच्या कारणावरून त्यांच्या वकिलांकडून जामीन अर्ज करण्यात आला मात्र ईडीने (ED) या जामीन अर्जाला विरोध केला आहे.
#NCP leader #NawabMalik's advocate informs the Special court that the Minister was shifted to JJ hospital after he allegedly collapsed in prison on Monday afternoon & his condition is serious
Special Judge remarks that prison officials didn't intimate the court@nawabmalikncp pic.twitter.com/iqZCtgzLyc
— Live Law (@LiveLawIndia) May 2, 2022
गेल्या अनेक दिवसांपासून मलिक हे जामीनासाठी कोर्टात धाव घेत आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांची याचिका (Petition) स्वीकारण्यास नकार दिला, तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 6 मे पर्यंत वाढवली, त्यामुळे मलिक आणखी अडचणीत आले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल हा मागवला आहे. आता मलिक यांना खाजगी रूग्णालयात हलवायचं की नाही यावर 5 मे ला सुनावणी होणार आहे. मलिकांच्या वकिलांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांची निलोफर मलिक (Nilofer Malik) आणि जावई समीर खान या दोघांना (Sameer Khan) मलिकांना भेटण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.
Web Title :- Nawab Malik Hospitalized | ncp leader nawab malik collapsed in jail hospitalized lawyer informed in court
हे देखील वाचा :
Pune Crime | वानवडीत बांधकाम सुरु असलेल्या धार्मिक स्थळाचा स्लॅब कोसळला, 7 जण जखमी तर 3 गंभीर