बहुजननामा ऑनलाईन- पाच दशकांहून अधिक काळ थांबून वयाच्या ७४ व्या वर्षी तिचे आई होण्याचे स्वप्न अखेर खरे ठरले. आंध्र प्रदेशमधील एका ७४ वर्षीय महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. डॉक्टरांच्या मते हे प्रकरण जागतिक विक्रम नोंदवण्यासारखे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी हा विक्रम २००६ मध्ये एका स्पॅनिश महिलेच्या नावावर आहे जी वयाच्या ६६ व्या वर्षी आई झाली. पूर्वी गोदावरी जिल्ह्यातील दिक्षाराममध्ये इ. मंगमय्याने जुळ्या मुलांना जन्म दिला.
गंटूरमधील खासगी रुग्णालयात इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) च्या माध्यमातून हा प्रयोग या महिलेवर करण्यात आला. स्त्रीरोगतज्ज्ञ सनक्कायला अरुणा यांनी आई आणि नवजात बाळ दोघेही बरे असल्याचे सांगितले. मंगयाम्माचे लग्न १९६२ मध्ये आय. राजाराव यांच्याशी झाले होते. काही दिवसांपूर्वी त्याच्याच शेजारी राहणाऱ्या महिलेने आयव्हीएफच्या माध्यमातून वयाच्या ५५ व्या वर्षी मुलाला जन्म दिला.
त्याने मंगयम्माच्या मनातही आशेचा किरण निर्माण झाला आणि तिने आयव्हीएफ प्रक्रिया अवलंबण्याचा निर्णय घेतला.यासाठी तिने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुंटूरमधील चंद्रबाबू मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. अरुणा यांच्याशी संपर्क साधला. आयव्हीएफच्या प्रक्रियेनंतर मंगयम्मा जानेवारीत गर्भवती झाली. तिचे वय लक्षात घेता संपूर्ण नऊ महिने तिला रुग्णालयात ठेवण्यात आले. यादरम्यान डॉक्टरांनी त्यांची पूर्ण काळजी घेतली. मंगमय्याला मधुमेह किंवा रक्तदाब सारखे आजार नसल्याने ती निरोगी राहिली. मात्र ती ७४ वर्षांची असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून प्रसूती करावी लागल्याचे डॉ. अरुणा यांनी सांगितले.