नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या क्रिकेट टीमचा माजी कर्णधार नासिर हुसैनने रोहित शर्माचे जोरदार कौतूक केले. त्याने म्हटले की, मुंबई इंडियन्सचा हा कर्णधार मर्यादित ओव्हरचा शानदार खेळाडू आहे, शिवाय एक शांत कर्णधारसुद्धा आहे. हुसैनने म्हटले की रोहित एक चांगला माणूससुद्धा आहे.
स्काय स्पोर्ट्सनुसार, हुसैनने म्हटले की, त्याची कॅप्टनशीप शानदार आहे. तो शांत आणि धैर्य राखणारा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा खेळाडू आहे. मुंबईसोबत त्याने चांगला काळ घालवला आहे. संपूर्ण जगात आता अनेक लोक बोलू लागले आहेत की, वेळ आली आहे की, विराट कोहलीने भारताची टी-20 टीमची कॅप्टनशीप सोडावी आणि रोहितने त्याची जागा घ्यावी. त्याचे विक्रम या गोष्टीची साक्ष देतात.
हुसैनने रोहित शर्माच्या फलंदाजीचे कौतुक केले. त्याने म्हटले, तो मर्यादित ओव्हर्सचा महान फलंदाज आहे. जर तुम्ही 50 ओव्हरमध्ये पाहाल तर त्याने काही दुहेरी शतके केली आहेत. टी-20मध्ये त्याने सूर गमावला होता; परंतु फायनलमध्ये त्याने धावा बनवल्या.
जेव्हा रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी पाचव्या आयपीएलचा किताब जिंकला, तेव्हापासूनच अनेक माजी क्रिकेटर रोहित शर्माला भारतीय टी-20 टीमचे कर्णधार पद सोपवण्याची वकिली करत आहेत. नुकतेच गौतम गंभीरनेसुद्धा रोहितला कर्णधार बनवण्याबाबत मत व्यक्त केले होते. गंभीरने तर आरसीबीलासुद्धा दुसरा कर्णधार शोधण्याचा सल्ला दिला होता.