सिन्नरः बहुजननामा ऑनलाईन – सिन्नर तालुक्यामध्ये एक घटना घडली आहे. तेथील डुबेरे सोनारी रस्यावर भरगाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने बिबट्याच्या दोन बछड्यांना चिरडले आहे. या अपघातात दोन बछड्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
डुबेरे सोनारी जावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन बिबट्याची मादी आणि तिचे तीन बछडे रात्री रस्त्यावरुन जात असताना त्याचदरम्यान रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या वाहनाने बिबट्याच्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांना धडक दिली यामध्ये त्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये मादी आणि तिचा एक बछड्याचा जीव वाचला. या अपघाताच्या भितीमुळे मादी आणि तिचा एक बछडा त्याच परिसरामध्ये लपून बसल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. त्यामुळे सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांनी गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे व सुरक्षतेच्यादृष्टीने उपाययोजना केल्या आहे.
बछड्यांना चिरडल्याची माहिती वनधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यानूसार अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. वाहनांचा शोध घेतल्यानंतर संबधितांवर कारवाई करणार असल्याचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी सांगितले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या बछड्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. वनउद्यानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.