बहुजननामा ऑनलाइन टीम – शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माजी आमदार आणि भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल या दोघांनी (Big blow to BJP)काल रात्री उशिरा खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. दरम्यान, हे दोघे आज शिवबंधन बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आज सकाळी अकरा वाजता खासदार राऊत यांची पत्रकार परिषद आहे. यावेळी दोघे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोघे शिवबंधन बांधणार आहेत. काल त्यांच्या भेटीच्या वेळी माजी महापौर विनायक पांडे देखील उपस्थितीत होते.
सुनील बागुल हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख होते. त्यांनी आधी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या आई भिकुबाई बागुल या भाजपाच्या विद्यमान उपमहापौर आहेत. वसंत गीते आणि सुनील बागुल हे दोघेही मूळ शिवसैनिक आहेत. वसंत गीते हे नाशिक मध्ये शिवसेनेचे पाहिले महापौर होते. मनसे स्थापन झाल्यानंतर वसंत गीते यांनी राज ठाकरे यांना साथ दिली. नंतर ते मनसेचे आमदार देखील झाले. भाजपाची सत्ता आल्यानंतर ते या पक्षात दाखल झाले होते. नाशिक महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपाने त्यांचे पुत्र प्रथमेश गीते यांना उपमहापौर पद दिले होते.