नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महाशिवआघाडी सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे नाशिकमध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीत या तिन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी माघार घेतल्याने नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी यांची तर उपमहापौरपदी भीखुबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी या नावांची ऑनलाइन घोषणा केली.
नाशिक महापालिका महापौर आणि उपमहापौर पदीची निवडणूक राज्यातील नव्या सत्ता समीकरणाची नांदी समजली जात आहे. दरम्यान, महाशिवआघाडीतील काँग्रेस नगरसेवक यावेळी बाहेर पडले, शेवटपर्यंत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा निवडणूक लढविण्याबाबत संभ्रम होता. ज्यामुळे भाजपची दावेदारी मजबूत झाली. यासाठी भाजपचे गिरीश महाजन यांनी परिश्रम घेतल्याचे समजते आहे. नाशिकात मनसेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर निवडून आला आहे. मनसेच्या पाचही नगरसेवकांनी भाजपला साथ दिली.
भाजपच्या १० नगरसेवकांना या महाशिवआघाडीने आपल्या बाजूने करण्याची रणनीती आखली होती. भाजपमधून फुटलेले नगरसेवक पुन्हा भाजपात आले. शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्न केला. मात्र या सगळ्या मनसेची भूमिका महत्वपूर्ण ठरली. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला साथ दिली. मात्र, शिवसेना, भाजप नगरसेवक फोडणाऱ्या बाळासाहेब सानप यांनी ऐनवेळी तलवार म्यान केल्याने भाजपला यश मिळाले.
Visit : bahujannama.com