बहुजननामा ऑनलाइन टीम – लोकायुक्तांच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र (AppointmentLetter) आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणीकृत सहीने बनावट ओळखपत्र तयार करण्याच्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला (fake appointment letter )आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात (Arrest) घेतले आहे. मात्र या गुन्ह्यातील मुख्य संशयित (Main suspect) आरोपी उमेश उदावंत अद्याप फरारी आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना मंगळवार (दि.15) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) बनावट (Fake) नियुक्तीपत्राद्वारे नियुक्तीच्या प्रकरणातील मुख्य संशयित उमेश उदावंत हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जिल्हा परिषद कार्यालयातील एका संशयित कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. उदावंतचा शोध लागल्यानंतर कार्यालयातील अन्य कोणाचा यामध्ये सहभाग आहे का याची महिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी उमेश उदावंतच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस घरी पोहचण्यापूर्वीच तो घर बंद करुन फरार झाला. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडे त्याच्याबाबत चौकशी केली मात्र, कोणतीच माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस करुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात ओळखपत्र तयार करणारा संशयित कर्डिले याच्या रविवार करंजा येथील दुकानातील संगणक व अन्य संशयास्पद वस्तू काल (रविवार) पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यातील माहितीची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. यामधून काही ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.