नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Nashik Crime News | राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहेत. हे आरोपी गोड बोलून सहज एखाद्याला आपल्या जाळ्यात अडकवतात. नाशिकमधील एक महिला आरोपींच्या याच भूलथापांना बळी पडली. या आरोपींनी पीडित महिलेला 20 लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत एका महिलेने फिर्यादी दिली आहे. नंदकिशोर काशीनाथ गरकळ, सुमित नंदकिशोर गरकळ व हृषिकेश गरकळ (तिघे रा. नायगाव, ता. सिन्नर) अशी आरोपींची नावे आहेत. (Nashik Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 नोव्हेंबर 2017 ते 20 मार्च 2020 या कालावधीत संशयितांनी त्यांना 20 लाखांचा गंडा घातला. फिर्यादी यांच्या भावास नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादी व त्यांच्या आईकडून आरोपींनी धनादेश, ऑनलाइन पद्धतीने 20 लाख 36 हजार 838 रुपये घेतले. मात्र त्यांनी भावाला काही नोकरी लावून दिली नाही. (Nashik Crime News)
त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे समजल्यावर फिर्यादी व त्यांच्या आईने नाशिकरोड पोलिस ठाण्यात
आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. नाशिकरोड पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Web Title :- Nashik Crime News | nashik the three together cheated a woman of 20 lakhs
हे देखील वाचा :
MC Stan | “त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला…” एमसी स्टॅनचा मोठा खुलासा
Vh1 Supersonic | भारताचा स्वतःचा बहु-शैली संगीत आणि जीवनशैली महोत्सव, व्हीएच1सुपरसॉनिक, पुण्यात