Dhayari Pune Crime News | पुणे : ‘याची विकेट टाकू’ तरुणावर कोयत्याने वार करुन बोट छाटलं; दोघांना अटक

July 5, 2024

पुणे :- Dhayari Pune Crime News | सात ते आठ जणांच्या टोळक्याने तरुणाचा पाठलाग करुन ‘याची विकेट टाकू’ असे म्हणून कोयत्याने डोक्यात वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केले. तसेच हातावर वार करुन बोट छाटून जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). हा प्रकार बुधवारी (दि.3) रात्री पावणे अकराच्या सुमारास धायरी परिसरातील पोकळे वस्ती (Pokale Vasti Dhayari) येथील सिल्व्हर नेष्टा सोसायटीच्या समोरील रस्त्यावर घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Raod Police Station) सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

याबाबत संदिप नरसिंग चव्हाण (वय-25 रा. राया रेसिडेन्सी, धायरेश्वर मंदिरा मागे, पोकळे वस्ती, धायरी, पुणे) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश चंदु जायगुडे (वय-18 रा. श्री गणेश रेसीडेन्सी, पोकळे वस्ती, धायरी), प्रशांत उर्फ सोन्या प्रकाश कोळी (वय-18 रा. वरदविनायक हाईट्स, धायरी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर इतर आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 109, 190, 191(2)(3) आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Kill)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप आणि त्याचे मित्र सोसायटीच्या जवळ गप्पा मारत होते. त्यावेळी चार दुचाकीवरून सात ते आठ अनोळखी तरुण हातात कोयते घेऊन आले. त्यामुळे संदिप घाबरून शेजारी असलेल्या सोसायटीत पळून गेला. तो सोसायटीच्या कंपाऊंडवरुन उडी मारुन पळून जात असताना त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो खाली पडला. आरोपी फिर्यादी तरुणाचा पाठलाग करुन त्याठिकाणी आले.

आरोपीपैकी एकाने मन्या कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावेळी संदिप याने मला माहित नाही सांगितले. मन्या नाहीतर नाही, याची विकेट टाकू असे म्हणून कोयत्याने संदिपच्या डोक्यात, पायावर वार करुन पाय फ्रॅक्चर केला. तसेच हातावर वार करुन बोट छाटले. आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी करुन पळून गेले. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.