नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Nashik Central Jail | बंदी वादी कैद्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला (Attack on policeman) केल्याची खळबळजनक घटना नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) घडली आहे. या हल्ल्यात प्रभूचरण पाटील (Prabhu Charan Patil) हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पाटील यांच्यावर कारागृहातील 10 ते 12 कैद्यांनी (Prisoners) जीवघेणा हल्ला केल्याची माहिती आहे.
बॅरेक का चेंज केलं, असा सवाल या पोलीस कर्मचाऱ्याने या कैद्यांना केला. त्यामुळे चिडलेल्या कैद्यांनी पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Beating) केली. खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपींनी ही मारहाण केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहातून (Yerawada Jail Pune) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेल्या कैद्यांनी ही मारहाण केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यामध्ये प्रभूचरण पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. 10 ते 12 कैद्यांनी पाटील यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याने कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एक महिन्यापूर्वी पुण्यातील येरवडा जेलमधून या कैद्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले होते.
जखमी पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कारागृह प्रशासन पुढील तपास करीत आहेत.
Web Title : – Nashik Central Jail | nashik central jail 10 to 12 prisoners attacked on policeman
हे देखील वाचा :