नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – पतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस बजावणीचे कलम 101 चे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 15 हजार 500 रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर (Assistant Registrar) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. एकनाथ प्रताप पाटील Eknath Pratap Patil (वय-57) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिक एसीबीने (Nashik ACB Trap) ही कारवाई गुरुवारी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील 29 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत वसुली विभागात काम करतात. पतसंस्थेतील थकीत कर्जदारांना कर्ज वसुलीची नोटीस (Loan Recovery Notice) बजावणीचे कलम 101 चे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात यातील एकनाथ पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे एका नोटीस चे दीड हजार रुपये असे 17 नोटीस चे एकूण 25 हजार 500 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता एकनाथ पाटील यांनी कलम 101 चे प्रमाणपत्र देण्यासाठी 25 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सापळा रचून मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी 15 हजार 500 रुपये लाच घेताना पाटील यांना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील (Deputy Superintendent of Police Abhishek Patil),
पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे (Police Inspector Sandeep Salunkhe) पोलीस अंमलदार सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Nashik ACB Trap | Assistant Registrar in anti-corruption net while accepting bribe of Rs.15 thousand
हे देखील वाचा :
Apla Pune Cyclothon | पुनीत बालन ग्रुप आपलं पुणे सायक्लोथॉन रविवारी (5 मार्च)