नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नांदेड लोकसभेचे भाजप-सेना रिपाई युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ उद्या दि.१३ एप्रिल २०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या अगोदर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नांदेड येथे झाली त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) यांनी दि ०६ एप्रिल २०१९ च्या नांदेड येथील सभेत अशोक चव्हाण यांच्या वर टीकेची झोड केली होती त्यांनी नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण लीडर नसून डीलर आहेत असा घणाघात केला होता त्यानंतर त्यांनी काँग्रेस ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यावर देखील हल्ला नरेंद्र मोदी साक्षीने चढवला होता त्यानंतर भोकर येथील होणाऱ्या ह्या सभेस देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्यावर कोणती नवीन टीका करतील ह्या साठी मात्र ह्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा भोकर शहरात सध्या सुरू आहे.
दि १३ एप्रिल २०१९ रोजी भोकर येथील मोंढा मैदानावर सकाळी १०:३० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बबनराव लोणीकर, प्रताप पाटील चिखलीकर(नांदेड लोकसभा उमेदवार),राम पाटील रातोळीकर, भास्करराव पाटील खतगावकर(माजी खासदार), मा.राज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,नागनाथ घिसेवाड,राजेश पवार, यांच्यासह अनेक भाजपा शिवसेना रिपाई प्रेमी या नवा मोंढा मैदानावर येणार आहेत ह्या मैदानाची जागा ही मुख्य भागात असल्याने अनेक लोक ह्या सभेला देवेंद्र फडणवीस यांना ऐकण्यासाठी येतील असे नागनाथ घिसेवाड यांच्या कडुन कळाले आहे.त्यामुळे ही सभा शहराच्या मुख्य भागात घेतली जाणार आहे असे ही ते ह्यावेळी सांगितले .या कार्यक्रमास भोकर येथील गणपत पिठ्ठेवाड(भाजप ता.अध्यक्ष),अमोल पवार (शिवसेना ता अध्यक्ष),संतोष मारकवार,राजेश अंगरवार,बाळा साखळकर,हरिभाऊ चटलावार,नंदू ऱ्याकावार,राजेश करपे,माधव जाधव ,शिवाजी पा किन्हाळकर, सुभाष किन्हाळकर, गणेश कापसे,अरशद शेख,इनामदार ,कमलाबाई गाजुलवार,साबळे अनिता,आदींनी सभा चांगली व यशस्वी व्हावी या करिता परिश्रम करताना दिसून आले सभेची तयारी जोरात असल्याची सुद्धा चित्र दिसून आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साठी चोख पोलीस बंदोबस्त देखील शहरात अनेक भागात लावला गेला आहे.