बहुजननामा ऑनलाईन – Namita Thapar | सोनी टीव्हीवरील ‘शार्क इंडिया सिझन 2’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या शोला नेटकऱ्यांनी देखील चांगलीच पसंती दर्शवली आहे. या कार्यक्रमातील परीक्षक ज्यांना शार्क म्हणून संबोधले जाते, त्यांची सोशल मीडियावर देखील अनेक चाहते वर्ग सध्या पाहायला मिळतात. त्यातीलच शार्क नमिता थापर (Namita Thapar) काही दिवसांपूर्वीच तिच्या मोलकरणीने केलेल्या पोस्टमुळे चर्चेत होती. पुन्हा एकदा आता नमिता चर्चेत आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शार्क इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये दोन महिला स्पर्धक आलेल्या असतात. ज्या महिला अंगानी धष्टपुष्ट असतात अशा महिलांसाठी फॅशनेबल कपडे बनवायचे काम त्या करत असतात. त्यांच्याबरोबर बोलताना नमिता थापर यांनी सर्रास होणाऱ्या बॉडी शेमिंग विषयी भाष्य केले आहे. यावेळी त्यांच्या व्यवसायाबद्दल शंका व्यक्त करताना नमिता म्हणाल्या “आपल्या देशात हे जे बॉडी शेमिंग आहे एखाद्याला जाड, बारीक, काळी हे सर्रास बोललं जातं. मग तुम्ही केवळ अशा महिलांसाठी कपडे का बनवण्याचा निर्णय घेतला नाही?” यावर त्या तरुणी उत्तर देत म्हणाल्या, “जर आम्ही त्यांच्यासाठी असे कपडे बनवले तर त्यांना इतरांपासून तोडल्यासारखे वाटते आणि हा आमचा उद्देश नाही. इतर महिलांप्रमाणे त्यांनाही समान वागणूक मिळावी या हेतूनेच आम्ही असा विचार केला आहे”.
या आधी देखील नमिता (Namita Thapar) यांनी लेखक चेतन भगत यांच्याबरोबर आयोजित एका टॉक
शोमध्ये बॉडी शेमिंग बद्दल भाष्य केले. त्यावेळी नमिता म्हणाली होती की,
“लहानपणी मी अशी नव्हते लहानपणी मी खूप जाड आणि माझ्या चेहऱ्यावर खूप केस होते.
मला बऱ्याचदा मिशी असलेली मुलगी म्हणून देखील चिडवायचे. कोणताही मुलगा माझ्याकडे आकर्षित होईल
अशी मी अजिबात नव्हते. लहानपणी माझ्यावर होणाऱ्या बॉडी शेमिंगचा माझ्या भवितव्यावर प्रचंड परिणाम
झाला आहे”. नमिता थापर ही एमक्युअर फार्मा कंपनीची डायरेक्टर आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Namita Thapar | shark tank india season two emcure pharmaceuticals ceo namita thapar shares her body shaming experience
हे देखील वाचा :
Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…