नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime | नागपूरमध्ये सध्या गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये नागपूरच्या खापा तालुक्यात महिलेवर सामूहिक अत्याचार (Gang Rape Nagpur) करण्यात आला आहे. बलात्कार केल्यानंतर या महिलेची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही या महिलेवर आरोपींनी बलात्कार केला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (Nagpur Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण ?
नागपूर जिल्ह्यातील खापा तालुक्यात हि संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील पीडित महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. यावेळी पीडित महिला शेतात एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्याकडे गेले. त्यानंतर त्यांनी या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र या महिलेने विरोध करताच आरोपींनी तिला जबर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. (Nagpur Crime)
हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली.
यानंतर आरोपींनी हि महिला मेलेली असतानादेखील तिच्या मृतदेहावर सामूहिक अत्याचार केले. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Web Title :- Nagpur Crime | woman murdered in nagpur accused arrested
हे देखील वाचा :
Pune Crime News | पैसे देत नसल्याने मित्रांनीच केले अपहरण; चौघांना अटक, खंडणीचा गुन्हा दाखल