नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूरमधून हत्येच्या दोन घटना समोर आल्या होत्या. या घटना ताज्या असताना अजून एक हत्येची घटना समोर आली आहे. ऐन संक्रातीच्या दिवशी हि हत्या करण्यात आल्याने संपूर्ण नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
विजय आणि बबलू उर्फ संजय सत्रामवार हे दोघे रविवारी काम संपल्यानंतर मिळालेल्या पैशांमधून दारू प्यायला बसले. त्यानंतर त्यांच्यामध्ये पैशावरून वाद झाला. यानंतर बबलूला भांडणाचा राग अनावर झाल्याने त्याने आपल्याजवळ असलेल्या चाकूनं विजयवर सपासप वार केले. यामध्ये विजय गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. (Nagpur Crime News)
तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोळीबार चौक परिसरात ही घटना घडली आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Web Title :- Nagpur Crime News | Nagpur shook! A young man was killed in a dispute over money between garbage collectors
हे देखील वाचा :