नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime News | काल 8 मार्च रोजी राज्यात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना कळंमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मिनीमाता नगरमध्ये घडली आहे. लतिका अमर भारद्वाज असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे तर अमर भारद्वाज असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Nagpur Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
अमर व लतिका भारद्वाज हे दाम्पत्य मागच्या काही काळापासून नागपूरच्या मिनीमाता नगरात वास्तव्याला होते. अमर भाजीचा ठेला चालवत होता तर लतिका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. अमर हा संशयी स्वभावाचा होता. तो आपल्या पत्नीवर नेहमी संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकवेळा कडाक्याचे भांडणसुद्धा होत होते. काही काळाने हे भांडण विकोपाला गेल्याने हे दोघे एकाच घरात पण वेगवेगळे राहत होते. (Nagpur Crime News)
यादरम्यान काही कामानिमित्त एक तरुण लतिकाच्या घरी आला होता. अमरने त्याला विरोध केला. यावरून अमर व लतिकामध्ये पुन्हा वाद झाला. यानंतर हा वाद एवढा वाढला कि अमरने लतिकाला घरात बोलवले व तिच्या डोक्यात हातोड्याने वार केला. हा वार एवढा भयंकर होता कि लतिकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
Web Title : Nagpur Crime News | husband murdered his wife due to suspicion of her character in nagpur
हे देखील वाचा :
Satish Kaushik Passes Away | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
International Women’s Day | दलित महिला उद्योगविश्वात यशाचे शिखर गाठू शकतात – पद्मश्री मिलिंद कांबळे