नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – Nagpur Crime | नागपूरमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोक एका शुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेत आहेत. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. यामध्ये उधारीचे पैसे मागितले म्हणून आरोपीने तरुणाची हत्या केली आहे. केवळ 20 रुपये उधारीवरुन हि हत्या करण्यात आली. नागपूरमधील जरीपटका या ठिकाणी हि घटना घडली आहे. (Nagpur Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे नेमके प्रकरण?
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पाणीपुरीचा ठेला लावून पीडित विक्रेता आपला उदरनिर्वाह करतो. मात्र, त्याच्याच बाजूला चिकनचे दुकान असलेल्या आरोपीने या ठेलेवाल्याकडून 20 रुपयाची उधारीवर पाणीपुरी खाल्ली. यानंतर पाणीपुरीवाल्याने जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे उधारीचे पैसे मागितले. तेव्हा आरोपीला राग आला अणि त्याने धमकी दिली तसेच कोंबडी कापण्याचा चाकूने पाणीपुरीवाल्यावर वार केले. यामध्ये पाणीपुरीवाला गंभीररित्या जखमी झाला. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nagpur Crime)
यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला शोधून त्याला अटक केली आहे. त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
केवळ 20 रुपयाच्या उधारीवरून या आरोपीने चक्क त्या पाणीपुरीवाल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात पाणीपुरीवाला गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पाणीपुरीवाल्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो यामध्ये थोडक्यात बचावला आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा सामान्य लोकांचा प्रश्न ऐरिणीवर आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Nagpur Crime | attack on one over just 20 rupees of borrow in nagpur
हे देखील वाचा :
Ratnagiri Crime | दुर्दैवी! दुचाकीवरून पडून महिला शिक्षिकेचा मृत्यू
Ajit Pawar | बाळासाहेब मुस्लिम विरोधक होते हे म्हणणं योग्य नाही, पण…- अजित पवार