पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत 14 दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा (Murder in Pune) उलगडा झाला आहे. मयत रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी ही महिला बेपत्ता झाली होती. याची तक्रार फरासखाना पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. पोलीस महिलेचा शोध घेत असताना महिलेचा खून (Murder in Pune) झाल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हनुमंत अशोक शिंदे (वय-40 रा. 277, बुधवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी हनुमंत आणि मयत रोजिना रियाज पानसरे यांचे विवाह बाह्य अनैतिक संबंध होते.
त्याने रोजिनाचा खून करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन मुळशी तालुक्यातील
पिरंगुट (Pirangut) आणि मुठा घाटात (Mutha Ghat) फेकून दिल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली.
या दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून आरोपीने महिलेचा 10 तारखेला गळा दाबून खून केला.
खून केल्यानंतर दोन दिवसांनी मृत शरीराचे तुकडे करुन दोन वेगवेगळ्या सिलपॅक बॅगेत भरले.
या दोन बॅगापैकी एक बॅग पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिराजवळ एक बॅग 50 फूट खोल घाटात
फेकून दिली. तर दुसरी बॅग लवासा रोडवरील (Lavasa Road) उरावडे आंबेगाव परिसरात मुठा घाटात फेकून दिली.
आरोपीने महिलेचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार भूगाव येथील मानस लेक तलावात (Manas Lake) फेकून दिले.
त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शिताफीने शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन पिरंगुट आणि मुठा घाटातून कुजलेल्या अवस्थेत मृतदेहाचे भाग ताब्यात घेतले.
यावेळी पोलिसांसोबत फॉरेन्सिक लॅबचे (Forensic Lab) अधिकारी उपस्थित होते.
Web Title : Murder in Pune | Murder of a woman in an immoral relationship, body parts thrown into a parachute and a handful of ghats; Huge excitement
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BJP leader Prasad Lad | ‘नारायण राणेंच्या जीवाला धोका – प्रसाद लाड