पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – अनैतिक संबंधातून एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून (Murder in Pimpri) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका महिलेला पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) अटक (Arrest) केली आहे. खूनाची (Murder in Pimpri) ही घटना चिंचवड स्टेशन (Chinchwad station) येथील व्हाईट हाऊस लॉजिंग व बोर्डिंग येथील रुम नं. 307 मध्ये शुक्रवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
पैगंबर गुलाब मुजावर (वय-35 रा. एमआयडीसी, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयत पैगंबर मुजावर याच्या पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.14) सायंकाळी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पैगंबर आणि आरोपी महिला एकाच दुकानात कामाला होते. या दोघांमध्ये मागील एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. पैगंबर भेटण्यास येत नसल्याने आणि लग्नाला नकार दिल्याने महिलेच्या मनात राग होता. यावरुन आरोपी महिलेचे आणि पैगंबर याचे वाद झाले होते. आरोपी महिला शुक्रवारी पैगंबर याला व्हाईट हाऊस लॉजिंग येथे घेऊन गेली. त्याठिकाणी पैगंबर याचा ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे (Assistant Police Inspector Londhe) तपास करीत आहेत.
Web Title :- Murder in Pimpri | Murder of one in immoral relationship, woman accused arrested
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्यास अटक