मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी केलेल्या कारवाईमध्ये एका यूट्यूब चॅनेलच्या (YouTube Channel) संचालकाला अटक केली. या संचालकाला (Director) अटक (Arrest) करुन पोलिसांनी त्याच्याकडून चरस जप्त केले आहे. या चरसची बाजारात 50 लाख रुपये किंमत असल्याचे मुंबई पोलिसंकडून (Mumbai Police) सांगण्यात येत आहे.
या कारवाई संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले, गौतम दत्ता Gautam Datta (वय-43)
याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने
(Anti-drug squad) अंधेरी (पश्चिम) येथून अटक केली आहे.
दत्ता हा जुहू-वर्सोवा लिंक रोड (Juhu-Versova Link Road) भागात राहत असून तो एक यूट्यूबवर चॅनल चालवतो.
दत्ता हा यूटूब चानलचा संचालक आहे. अटेकत असलेला दत्ता बॉलिवूडशी (Bollywood) चांगले संबंध असून तो बॉलिवूड कलाकारांना चरस (Hashish) पुरवतो असा संशय आहे.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title : Mumbai Police | mumbai police arrested director of youtube channel and seize rs 50 lakh worth of hashish
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update