बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई : गोरेगाव पश्चिममधील बांगुलनगर येथील आदिपुरुष’ या चित्रपटाच्या सेटला आग लागल्याची घटना मंगळवारी मुंबईत घडली. येथील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या एका फिल्म स्टुडिओला दुपारी ४.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत स्टुडिओतील सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल एक तासानंतर ही आग नियंत्रणात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, आदिपुरुष’ या चित्रपटाचा तेथे सेट आहे. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या क्रोमा शूटसाठी मुंबईत सेट लावण्यात आला होता. अभिनेता सूर्या हा इथं एका दृश्याचं चित्रीकरण करत असता, तेवढ्यातच सेटला आग लागली. आगीची माहिती मिळताच सेटवरील ५० ते ६० कलाकार आणि कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. या स्टुडिओत खुर्च्या आणि इतर फर्निचर होतं. त्यामुळे आगीने लाकडी सामानाला तात्काळ पेट घेतला. त्यातच सोसायट्याचा वारा सुटल्याने ही आग अधिकच भडकली. तोपर्यंत आगीने पेट घेतला. आग आणि धुराचे लोट पसरल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.
#WATCH I Mumbai: A fire has broken out at a studio in Goregaon; 8 fire tenders present at the spot. No injuries reported yet. More details awaited. pic.twitter.com/GJ9pNB0q0x
— ANI (@ANI) February 2, 2021