मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारी (दि. 19) झालेल्या बैठकीत न्यायाधीशांची रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार मुंबईला 9 नवे न्यायाधीश मिळणार आहेत. सर न्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायमूर्ती एन. व्ही रामन्ना, आर. एफ नरीमन बैठकीस उपस्थित होेते. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची 94 पदे मंजूर असून त्यातील 30 पदे अद्याप रिक्त आहेत.
सर्वोच्य न्यायालयाच्या कॉलेजियमच्या झालेल्या बैठकीत अरुणा एस पै, शैलेश पी. ब्रम्हे, कमल आर. खटा, शर्मिला यु. देशमुख, अमीरा अब्दुल रझाक, संदीप व्ही मार्णे, संदीप एच. पारीख, सोमेशेखर सुंदरसन आणि महेंद्र एम नेरळीकर आदी 9 वकीलांची न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस केली आहे. राजेश एन. लड्डा, संजय जी. मेहरे, जी. ए. सानप, आणि एस. जी. दिगे आदी न्यायिक अधिका-यांची उन्नतीची शिफारस करण्यात आली आहे.