नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणून दत्रात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिष्ठान सभेने ही निवड केली आहे. बंगुळुरु येथे सुरु असलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. दत्तात्रेय होसबळे हे २००९ पासून आरएसएसचे सहसरकार्यवाह होते. भय्याजी जोशी यांच्या जागेवर त्यांची आता निवड झाली आहे.
Akhil Bharatiya Pratinidhi Sabha of RSS elected Dattatreya Hosabale as its ‘Sarkaryavah’. He was Sah Sarkaryavah of RSS since 2009: RSS
— ANI (@ANI) March 20, 2021
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील सोराबा तालुक्यात १ डिसेंबर १९५५ रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षी १९६८ मध्ये होसबळे हे संघात स्वयंसेवक बनले. १९७२ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम पाहू लागले. १५ वर्षे त्यांनी परिषदेचे संघटन महामंत्री म्हणून काम पाहिले. २००४ मध्ये त्यांना संघाचे अखिल भारती सह बौद्धिक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. २००९ पासून ते सहसरकार्यवाह म्हणून कार्यरत आहेत.
दत्तात्रेय होसबळे हे मातृभाषा कन्नडबरोबर इंग्रजी, हिंदी, संस्कृत, तामिळ, मराठी, आदि अनेक भारतीय व विदेशी भाषा अवगत आहेत़ इंग्रजीमधून त्यांनी पदवी संपादन केली आहे़ असीमा या लोकप्रिय कन्नड मासिकाचे ते संस्थापक संपादक आहेत.