मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– MPSC Recruitments 2022 | सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission-MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट ब) संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची 800 पदांच्या भरतीची जाहिरात (MPSC Recruitments 2022) आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम एमपीएससीमार्फत करण्यात येणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यातील 37 केंद्रावर 8 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच, मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यात अथवा त्यानंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहायक कक्ष अधिकारी (Assistant Section Officer) (गट ब) या संवर्गातील 42, राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) (गट ब) या संवर्गातील 79, पोलीस उपनिरीक्षक (PSI) (गट ब) या संवर्गातील 603 आणि दुय्यम निबंधक संवर्गातील 78 पदांची भरती करण्यात येणार आहे. (MPSC Recruitments 2022)
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येईल. https://t.co/I6U0WqO7xK
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 23, 2022
राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक 2 तपासल्यानंतर, ज्या उमेदवारांना किमान 33 टक्के गुण म्हणजेच 66 अथवा त्यापेक्षा जादा गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक 1 तपासला जाईल.
पेपर क्रमांक एकच्या गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. तसेच.
“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्याने आर्टस्, काॅमर्स शाखेमधील विद्यार्थ्यांना याचा जादा फायदा होणार आहे.
आत्तापर्यंत सिसॅटच्या गुणांमुळे सायन्स शाखा, तंत्रशिक्षण असलेल्या उमेदवारांचे पारडे जड राहात होते.
आता सर्वांना समान संधी उपलब्ध होऊ शकणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MPSC Recruitments 2022 | mpsc declared recruitment for 800 different vacancies maharashtra news
हे देखील वाचा :
Pune Crime | पाषाण परिसरात मद्यपी रिक्षाचालकाची पोलिसांना मारहाण, उपनिरीक्षकही जखमी
Chandrakant Patil | ‘महापूजा करायला कोणते मुख्यमंत्री येणार हे विठुमाउलींनाच ठाऊक’ – चंद्रकांत पाटील