सातारा : बहुजननामा ऑनलाइन – MP Udayanraje On Govt Officers – Satara News | खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेचा विषय असते. शुक्रवारी साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन बसण्याची वेळ येईल’, असे ते यावेळी म्हणाले (MP Udayanraje On Govt Officers – Satara News )
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
“करेक्ट बोलतो, म्हणून कॉलर उडवतो”
साताऱ्यातील कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन (Agricultural Industrial Vehicle Exhibition) उद्घाटन कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, “मी करेक्ट बोलतो, म्हणून कॉलर उडवतो. मी नेहमीच मनापासून बोलतो”, असे म्हणत उदयनराजे भोसलेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना चांगलं काम करण्याचा सल्ला दिला. “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन बसण्याची वेळ येईल’,असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. (MP Udayanraje On Govt Officers – Satara News )
शिवेंद्रसिंहराजेंना खोचक टोला
“शिवेंद्रसिंहराजे (MLA Shivendraraje Bhosle) यांचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे.
त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसही जात नाही.
मी माझा इतका प्रचार करत नाही, तितका ते माझा प्रचार करतात. माझे ते मुख्य प्रचारक आहेत.
आरशापुढे उभे राहिलो तर मी माझं एक वेळ नाव विसरेन.
पण ते आरशासमोर उभे राहिले तरी भांग पाडताना त्यांना माझं नाव दिसते”,
असे म्हणत उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंना खोचक टोला लगावला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MP Udayanraje On Govt Officers – Satara News | bjp mp udayanraje bhosle collar style slams government officers
हे देखील वाचा :