सातारा : बहुजननामा ऑनलाइन – खा. उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांच्यातील वाद सगळ्यांना माहित आहे. सध्या हे दोघे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद अधूनमधून समोर येत असतो. हे दोन्ही राजे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता ग्रेडसेपरेटरवरून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले उदयनराजे?
पैसे खाणार्या त्या उच्चशिक्षित लोकांना आपल्या आयुष्यात पैसे खाण्यापलीकडे काय माहित नाही, त्यांना ग्रेडसेपरेटरचे (Gradeseparator) काय कळणार? वैयक्तिक टीका करणे त्या लोकांचा गुणधर्म आहे. आम्ही ग्रेडसेपरेटरमध्ये काय पैसे खाल्ले हे दाखवा? कुठे पैसे खाल्ले? आम्हाला खायची सवय नाही तर काम करायची सवय आहे, अशी टीका खा. उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केली आहे. आ. शिवेंद्रराजे यांनी बनकर एजन्सीने (Bunker Agency) ग्रेडसेपरेटरचा सर्व्हे केला आहे का? अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना उदयनराजेंनी हि टीका केली आहे.
तसेच पैसे खाणार्या त्या उच्चशिक्षित लोकांना आयुष्यात पैसे खाण्यापलीकडे काय माहित असणार,
त्यांना ग्रेडसेपरेटरचे काय कळणार? अशी टीकादेखील त्यांनी केली.
नक्की ट्राफिक कुठे आहे हे बघण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन थांबा.
वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून त्यांना ती वाढ झाली आहे असे वाटत नाही.
तहान लागल्यावर विहीर खोदणार का? असा सवाल करत तुम्ही म्हणता आम्ही केले मग दाखवा काय केले ते.
असा आव्हानदेखील उदयनराजेंनी यावेळी दिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MP Udayanraje Bhosale | You say we did, then show us what we did, Udayanraje’s MLA Shivendraraj’s counter attack
हे देखील वाचा :