बहुजननामा ऑनलाइन टीम – मध्य प्रदेशात शिवसेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. त्याचवेळी रमेश साहू यांच्या पत्नी व मुलीला देखील आरोपींनी जखमी केले आहे. ही घटना झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.
मध्य प्रदेश शिवसेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले रमेश साहू यांची इंदूरजवळील उमरी खेडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. उमरी खेड्यात रमेश साहू साई राम ढाबा चालवत असत. रमेश साहू यांना अज्ञात इसमांनी गोळ्या घालून ठार केले. दरम्यान, बचावासाठी आलेल्या मृताची पत्नी आणि मुलीला देखील आरोपींनी जखमी केले आहे. तथापि घटनास्थळावरून कोणतीही वस्तू किंवा पैसा चोरीला गेलेला नाही. आरोपींनी केवळ हत्येची घटना घडवून आणली आहे. यामुळे पोलिस घटनेमागे जुन्या काही कटांचा अंदाज घेत आहेत. घटनेनंतर रमेश साहू यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.
10 वर्षांपेक्षा पेक्षा जास्त काळापर्यंत होते प्रदेशाध्यक्ष
मध्य प्रदेशात रमेश साहू हे 10 वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले होते. ताज्या प्रकरणात काही अज्ञात दुचाकीस्वार खंडवा रोड येथील शिवसेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रमेश साहू यांच्या ढाब्यावर पोहोचले आणि त्यांनी शिवसेनेच्या माजी प्रमुखांची हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाले.
पोलिसांचा तपास सुरू
कुटूंबाच्या म्हणण्यानुसार लुट करण्याच्या हेतूने खून करण्यात आला आहे. त्याचवेळी मृत रमेश साहू यांच्यावर तेजाजी नगर व सदर बाजार परिसरात गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यासाठी पोलिस जुन्या शत्रुत्वाच्या प्रकरणांवर तपास करत आहेत. त्याचवेळी हत्येची माहिती मिळताच सीएसपी, एएसपी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.