अमरावती : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरून (Congress’ ‘Bharat Jodo’ Yatra) भाजपा (BJP) खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधी आणि राम यातील ‘रा’ हा रामा सारखा आहे. त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करत आहेत, असे म्हंटले होते. त्यावर अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नाना पटोलेंना हे समजले पाहिजे की, ‘रा’ पासून राहुल होतो, राम होतो आणि रावण देखील होतो. राहुल गांधी आणि रावणात जास्त साम्य आहे. राम उत्तरेपासून दक्षिणेकडे गेले होते. पण राहुल गांधी उलटे करत आहेत. राहुल गांधी दक्षिणेकडून उत्तरेकडे निघाले आहेत. नाना पटोले यांना अजून राम समजलेला नाही. तसेच ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती आणि नारे दिले होते, त्यांच्या गळ्यात गळे घालण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. म्हणून राहुल गांधी रावणाचे काम करत आहेत, रामाचे नाही. नाना पटोलेंना देखील श्रीराम अजून समजले नाहीत, असा टोला देखील अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी लगावला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले होते.
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करुन रामाचे काम करत आहेत, असे नाना पटोले म्हणाले होते.
राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3570 किमीची पायी ‘भारत जोडो’ पदयात्रा सुरु केली आहे.
ही यात्रा अनेक राज्यांतून जाणार आहे. त्यामुळे राहुल गांधी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
Web Title :- MP Anil Bonde | …So Rahul Gandhi and Ravana have more in common, eat. Commentary by Anil Bonde
हे देखील वाचा :
Ajit Pawar | ‘या’ कारणामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार गेले थेट बारामतीला