पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Morgaon-Jejuri Road Accident | जेजुरी येथे देवदर्शन करून मित्रांसमवेत परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू (Died) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना मोरगाव-जेजुरी रस्त्यावर (Morgaon-Jejuri Road Accident) मावडी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विनोद जाधव (Vinod Jadhav) (32, रा. भवानीनगर, ता. इंदापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी की, जेजुरीहून देवदर्शन करून चौघे मित्र परतीच्या वाटेवर होते. यावेळी मावडी गावाच्या हद्दीमध्ये चारही मित्र लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी दुचाकीने जोरदार धडक दिल्याने विनोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी विनोद यांना उपचारासाठी मोरगाव येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलयात (Siddhivinayak Hospital) दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले आहे. (Morgaon-Jejuri Road Accident)
Web Title : Morgaon Jejuri Road Accident | young man returning from jejuri dies in an accident
हे देखील वाचा :
Gold Silver Price Today | सोन्यात पुन्हा तेजी ! जाणून घ्या आजचे सोन्या – चांदीचे दर
Petrol-Diesel Price Today | इंधन दरात काय बदल झाला? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर