बहुजननामा ऑनलाइन टीम – भोजपुरी सेंसेशन आणि टीव्ही अॅक्ट्रेस मोनालिसा (Mona Lisa’s ) बी टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी सोशल मीडियावर ती फेमस आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते जे नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले होते. यात ती बोल्ड बिकीनीत दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं सोशलवर राडा घातला आहे. यावेळी मोनालिसचा(Mona Lisa’s ) तिच्या डान्स व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे.
मोनालिसानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती बॉलिवूड साँगवर डान्स करताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिंक कलरची साडी घातली आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिनं केलेल्या स्टेप्सही चाहत्यांना आवडल्या आहेत. व्हिडीओ शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये गाण्याचं नावही लिहिलं आहे.
मोनाचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. मोनाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहेत कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.
मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचंही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये काम करत आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे. ब्लॅकमेल सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमात ती अजय देवगण आणि सुनील शेट्टी यांच्यासोबत दिसली होती. मनी है तो हनी है, सरकार राज, गंगा पुत्र असे तिचे काही बॉलिवूड सिनेमे सांगता येतील. मोनालिसा बिग बॉस 10 मध्ये झळकली होती. मोनालिसानं हिंदी, बंगाली, तमिळ, तेलगू आणि कन्नड अशा अनेक भाषेतील सिनेमात काम केलं आहे. मोनालिसाचं खरं नाव अंतरा विश्वास आहे. तिनं 125 हून अधिक भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.