नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी केंद्रीय कर्मचार्यांसाठी व्हेरिएबल डियरनेस अलाऊन्स म्हणजे डीएमध्ये वाढीची घोषणा केली. याचा लाभ 1.5 कोटी कर्मचार्यांना मिळेल. अगोदर व्हेरिएबल डीए 105 रुपये प्रति महिना होता जो वाढवून 210 रुपये प्रति महिना करण्यात आला आहे. हा मागील 1 एप्रिल 2021 पासून प्रभावित होईल.
या व्हेरिएबल डियरनेस अलाऊन्समुळे केंद्रीय कर्मचार्यांच्या किमान वेतनात सुद्धा वाढ होईल. रेल्वे, खाण, ऑईल फिल्ड्स, बंदर आणि केंद्र सरकारच्या इतर संस्थांच्या कर्मचार्यांना याचा लाभ मिळेल. हा दर काँट्रॅक्ट किंवा कॅज्युअल दोन्ही प्रकारच्या कर्मचार्यांवर समान प्रकारे लागू असेल.
न्यूज एजन्सी पीटीआयसोबत बोलताना सेंट्रल चीफ लेबर कमिश्नर (सीएलसी) डीपीएस नेगी यांनी म्हटले की, केंद्रीय क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात प्रति महिन्यात 105 रुपयांपासून 210 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. एका वक्तव्यात कामगार मंत्रालयानंतर हे नोटिफाय केले आहे की, व्हेरिएबल डीए किंवा रिवाईज्ड रेट 1 एप्रिल 2021 पासून प्रभावी होईल.
कामगार मंत्रालयानुसार, अशावेळी जेव्हा देश कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा सामना करत आहे, केंद्रीय क्षेत्रातील विविध श्रेणीच्या कर्मचार्यांना मोठा दिलासा देत कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकारने 1.4.2021 पासून व्हेरिएबल डियरनेस अलाऊन्सचा दर रिव्हाईज करण्याचा निर्णय घेतला आहे.