नवी दिल्ली – वृत्त संस्था – Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच (Modi Cabinet Expansion) मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी 6 वाजता मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, सध्याच्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू दिला जाणार होता. आता केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (ramesh pokhriyal) यांना हटवण्यात आलं आहे. त्यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पोखरियाल निशंक (ramesh pokhriyal) यांना त्यांच्या खराब प्रकृतीमुळे मंत्रिपदावरून हटवण्यात आलं असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील खासदार देबोश्री चौधरी यांना देखील मोदी मंत्रिमंडळातून (Modi Cabinet Expansion) हटविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबोश्री चौधरी यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांचा देखील राजीनामा येऊ शकतो.
केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष गंगवार हे बरेली लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. त्याच्याऐवजी उत्तरप्रदेशातील बडया नेत्याला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.
web title: Modi Cabinet Expansion | Big excitement even before the expansion of Modi’s cabinet! Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank resigns.
Suspension of 12 MLAs | 12 आमदारांचे निलंबन मागे न घेण्यावर महाविकास आघाडी ठाम