नवी दिल्लीः वृत्त संस्था – भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल ( BSNL) ही सरकारी टेलिकॉम कंपनी सर्वात स्वस्त डेटा प्लान देणाऱ्या अन्य कंपन्यांच्या पुढे आहे. खासगी कंपनीला जबरदस्त टक्कर देणाऱ्या बीएसएनएलने आणखी एक नवीन वर्क फ्रॉम होम प्रीपेड प्लान आपल्या ग्राहकांसाठी बाजारात आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 70 जीबी हाय स्पीड डेटा दिला जात आहे. जाणून घ्या या नवीन प्लानसंबंधी.
जे लोक अजूनही वर्क फ्रॉम होम करीत आहेत, अशा लोकांसाठी BSNLने हा प्लान आणला आहे. प्लानची किंमत 251 असून यात केवळ 70 डेटा मिळतो. या प्लानची वैधता 28 दिवस असून कोणत्याही प्रकारची कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळत नाही. हा प्लान केवळ डेटा साठी ओळखला जातो.
151 रुपयांच्या प्लानमध्ये 40 जीबी डेटा
BSNL कडे आणखी एक 151 रुपयांचा एसटीव्ही आहे. ज्यात 40 जीबी डेटा मिळत असून वैधता देखील 28 दिवसांची आहे. हा एक डेटा प्लान आहे. या महिन्याच्या सुरुवातीला BSNL ने एसटीव्ही सोबत झिंग म्यूझिक ॲप चे फ्री सब्सक्रिप्शन देणे सुरू केले आहे.
जिओकडे तीन वर्क फ्रॉम होम प्लान
खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे वर्क फ्रॉम होम प्लानचे तीन प्लान आहेत. 151 रुपये, 201 रुपये, आणि 251 रुपयांचे तीन प्लान असून या प्लानमध्ये अनुक्रमे 30 जीबी, 40 जीबी आणि 50 जीबी डेटा मिळते. जर तुम्हाला जिओ आणि BSNL चे 251 रुपयांच्या प्लानची तुलना करायची असेल तर बीएसएनएल 20 जीबी अतिरिक्त देते. परंतु, यात एक खास बाब म्हणजे जिओकडे 4 जी डेटा आहे तर BSNL कडे 3 जी डेटा उपलब्ध आहे.