मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | राज्याच्या राजकारणात महाभूकंप झाला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेल्या राजीनाम्यानंतर ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळलं आहे. यामुळे राज्यभर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे सरकारला धक्का बसला आहे. यानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आता ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्याच्या सत्तानाट्यावर पहिलीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हास सुरू होतो,” असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरेंचा हा रोख उद्धव ठाकरेंवर असल्याची चर्चा आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षाला नवं वळण लागलंय. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
त्यामुळे राज्यात आता भाजपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे.
शिंदे गटाने केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आणि अखेर ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MNS Chief Raj Thackeray | MNS Chief Raj Thackeray On Shivsena Uddhav Thackeray
हे देखील वाचा :
Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही