मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यानंतर ठाकरे-शिंदे गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. बालिशपणा थांबवा आणि आत्मपरीक्षण करा, अशी खरमरीत टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, ते कुणालाही घाबरत नाहीत म्हणून ठाकरे कुटुंबाने बालिशपणाची वक्तव्य करु नयेत, असा सल्लाही संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय म्हणाले संजय गायकवाड?
आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य टीव्हीवर पाहून मला हसू येतंय, ज्यावेळी आम्ही शिंदे साहेबांसोबत बाहर पडलो, त्यावेळी तुम्ही भाजपच्या (BJP) त्रासाला कंटाळून राजीनामा दिलाय, असा व्हिडीओ व्हायरल केला. अन् आता तुम्ही म्हणताय की, एकनाथ शिंदे घाबरुन बाहेर गेलेत. एकवेळ एकनाथ शिंदेंचं सोडा, पण त्यांच्याबरोबर गेलेले 40 आमदारही घाबरून गेले का?यांना पण तुम्ही जेलमध्ये घालणार होता का? म्हणूनच हे सगळे नाटक सुरु आहे. एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत, ते कुणालाही घाबरत नाहीत म्हणून ठाकरे कुटुंबाने बालिशपणाची वक्तव्य करु नयेत, असा सल्ला संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी दिला.
नव्याने पक्षबांधणी करा- गुलाबराव पाटील
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या गौप्यस्फोटावर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही समाचार घेतला. ते म्हणाले, आमच्या बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेलेत. किती दिवस एकच विषय लावून आम्हाला छळण्यापेक्षा आता नव्याने पक्षबांधणी करुन सरकार कसं येईल याचा विचार करा, असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे.
Web Title :- MLA Sanjay Gaikwad | sanjay gaikwad slams aaditya thackeray over statement on cm eknath shinde shivsena maha vikas aghadi maharashtra
हे देखील वाचा :
Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्यास अटक, 8 लाखाचे अंमली पदार्थ जप्त