अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामध्ये सुधारणा होत आहे. मात्र, अनेक कामे रखडलेली आहेत. घरकुल लाभार्थ्यांचेदेखील अनुदान थकले आहे. थकलेले अनुदान मिळावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेऊन रमाई आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना घराचं बांधकाम करता यावे, यासाठी प्रलंबित अनुदान देण्याची मागणी केली आहे.
घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक लाभार्थींचे सध्या अनुदान थकल्याने कामे रखडली आहेत. घरकुल मिळावे म्हणून ग्रामपंचायत पात्र लाभार्थ्यांची यादी करते. त्यानंतर सरकार घर बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान देते. मात्र, अनुदान थकल्याने पात्र लाभार्थ्यांची घराची कामे रखडली आहेत. रखडलेली कामे पूर्ण करता यावीत म्हणून आमदार रोहित पवार यांनी अनुदान देण्याची मागणी धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
राज्यातील आणि माझ्या मतदारसंघातील रमाई आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना घरांचं बांधकाम करता यावं म्हणून त्यांचं प्रलंबित अनुदान मिळावं,यासाठी सामाजिक न्यायमंत्री @dhananjay_munde जी यांची भेट घेतली. याबाबत त्वरित निर्णय घेऊन सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी मंत्रीमहोदयांनी दिलं. pic.twitter.com/TKDJT2LDzW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 8, 2020
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील आणि माझ्या मतदारसंघातील रमाई आवास योजनेच्या पात्र घराचं बांधकाम करता यावं म्हणून त्यांचं प्रलंबित अनुदान मिळावं. यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. याबाबत त्वरित निर्णय घेऊन सहकार्य करण्याचं आश्वासन मंत्री मुंडे यांनी दिलं असल्याचे म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांना टॅग केले आहे.