पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी नुकतेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यापाठोपाठ आता कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे (Kasba Peth Assembly Constituency) नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी देखील ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ असं विधान केलं आहे. सोलापूर येथे काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाच्यावेळी रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील (BJP MLA Chandrakant Patil) यांना टोला लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) म्हणाले, सोलापूरमध्ये पत्रकारांसोबत बसलो होतो. त्यावेळी अजित पवार यांच्या सध्या सुरु असलेल्या हालचालींबाबत मला विचारण्यात आले. त्यावर मी म्हणालो अजित पवार आमचे नेते आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व (Maharashtra Political News) आहे. त्यांना काय, मलाही मुख्यमंत्री व्हायचंय. सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री व्हावं. यापलीकडे मी काहीही बोललो नाही.
खासदार होणार का?
पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रवींद्र धंगेकरांचा विचार केला जात असल्याची चर्चा चालू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते यावर निर्णय घेतील. हा विषय माझा नाही. पक्षानं जो उमेदवार दिला, त्याला निवडून आणण्याचं काम मला करावं लागेल, असे धंगेकर यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील पाहुणे आहेत
यावेळी धंगेकर यांनी पुण्यातील भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. चंद्रकांत पाटील पाहुणे आहेत. ते या निवडणुकीच्या आधी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहेत. त्यांची काही पुण्याशी नाळ नाही. पाहुण्या मंडळींना किती दिवस आपल्या घरी ठेवायचं हे पुणेकरांनी ठरवलं आणि भाजपच्या लोकांनीही, असं ते म्हणाले.
पुण्यातील नेते षंढ नाहीत
भाजपच्या काही जणांना ते आवडत नाहीत. माझ्यासह त्यांच्या पक्षातील अनेक लोक त्यांनी येथून पाठवायला तयार आहे. त्यांचा पुण्याशी काहीही संबंध नाही. दोन वर्षात येणार आणि पुण्याच नेतृत्व करणार. पुण्यातील लोक, पुण्यातील नेते एवढे षंढ नाहीत, ते वरुन आलेलं नेतृत्व आहे, असंही धंगेकर म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर राग
यावेळी धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा माझ्यावर राग असल्याचे सांगितले. मला ते दोघे भेटलेच नाहीत. त्यांचा माझ्यावर भरपूर राग आहे कारण एवढे पैसे वाटूनही त्यांचा पराभव झाला. पुणेकरांनी त्यांना माघारी पाठवले. त्याचा राग त्यांच्या मनात आहे. राजकारणात पराभव सहन करणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. त्या पराभवातून ते अद्याप बाहेर आलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
Web Title :- MLA Ravindra Dhangekar | kasba peth mla ravindra dhangekar mocks eknath shinde devendra fadnavis
हे देखील वाचा :