MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | ‘सगळीकडे आपण आणि आपले कुटुंबीय हवेत अशी एकनाथ खडसे यांची भूमिका’ – मुक्तााईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | जळगावातील मुक्तााईनगरचे (Muktainagar) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या मतदारसंघात ‘शिवसंपर्क अभियान’ सुरू केले आहे. यावेळी पहिल्याच दिवशी त्यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासह त्यांच्या घराणेशाहीवर टीका केली. सगळीकडे मीच हवा? ही कोणती पध्दत आहे? अशी विचारणा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. (MLA Chandrakant Patil On Eknath Khadse)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
माझी लढाई कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. मी राजकीय पक्षांशी लढाई करायला आलो नाही. माझी लढाई एकनाथ खडसे यांच्या कुटुंबासोबत आहे. या लढाईत माझ्यासोबत जनता आहे. मला जनतेने पाच वर्ष संधी दिली आहे. त्या संधीचे मी सोने करणार आहे, असे यावेळी पाटील म्हणाले. तसेच एकनाथ खडसेंच्या शेतात काय
काय पिकते, की त्यांची इतकी भरभराट झाली. तसेच खडसे भाषणांत अत्यंत बेताल वक्तव्ये करतात. जो व्यक्ती आपला जावई तुरूंगात असताना दणक्यात वाढदिवस साजरा करतो, जो व्यक्ती अन्य जातींबाबत अपमानास्पद बोलतो, राजकीय विरोधकांवर शेलक्या शब्दांमध्ये टिका करतो, सगळीकडे आपण आणि आपले कुटुंबिय हवे अशी भूमिका घेतो, त्यांना मी त्यांची जागा दाखवणारच, असे यावेळी आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil On Eknath Khadse म्हणाले.
मागील काही दिवसांपूर्वी देखील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी
एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. एकनाथ खडसे यांना सर्व पदे त्यांच्या घरात हवी आहेत.
सर्व ठिकाणी त्यांना त्यांच्या घरातील माणसे लावायची आहेत, असे गिरीश महाजन म्हणाले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | ‘Eknath Khadse’s role is that everyone wants you and your family’ – Muktainagar MLA Chandrakant Patil
हे देखील वाचा :
Comments are closed.