बहुजननामा ऑनलाइन – हैदराबाद आणि उन्नावमध्ये घडलेल्या घटनेला अजून पुर्णविराम लागला नाही तर लगेच अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा घडली आहे. ही घटना फतेहपूरमध्ये घडली आहे. १८ वर्षाची मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीला पेटवून देऊन तो पळून गेला. सध्या मुलीची प्रकृती गंभीर असून तिला हैलट रुग्णालयात दाखल केले आहे. नात्याने काका लागत असलेल्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.
नात्याने काका असलेल्या २२ वर्षीय आरोपीची वाईट नजर त्या मुलीवर होती. घरात तिला एकटे असल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला पेटवून देऊन पळून गेला. ही घटना फतेहरपूरमधील हुसैनगंज पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात घडली आहे.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार , सदर मुलगी शनिवारी दुपारी घरी एकटी होती. हे पाहून नात्याने काका लागत असलेला तरुण घरात शिरला व तिच्यावर अत्याचार केले. तिने सदर घटना घरात सांगण्याची धमकी दिली असता आरोपीने रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.
त्यानंतर मुलगी आरडा-ओरडा करत बाहेर पाळली. गावातील लोक जमले. त्यांनी पोलिसांना कळविले. तसेच रुग्णवाहिकेने तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तपासाला सुरुवात केली. महिला पोलिस ठाणेदाराने मुलीची जबाब नोंदवला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.