बहुजननामा ऑनलाइन टीम – अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. अलीकडेच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्यांनी हा सीजन पाहिला आहे त्यांना आता तिसऱ्या सीजनची प्रतिक्षा आहे. या सीरिजमधील मुन्ना त्रिपाठी, गुड्डू, कालीन भैया आणि गोलू असे पात्र खूप गाजले आहेत. दुसऱ्या सीजनमध्ये मुन्ना त्रिपाठीचा हृदयावर गोळी लागून मृत्यू झाल्याचं दाखवलं आहे. दिव्येंदु शर्मा (Divyendu Sharma) यानं ही भूमिका साकारली आहे.
अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत दिव्येंदूला विचारण्यात आलं की, मिर्झापूर 3 मध्ये मुन्ना त्रिपाठीच्या वापसीची काही शक्यता आहे का ? यावर दिव्येंदुनं उत्तर दिलं आहे.
दिवेंद्यु म्हणाला, “मी विचार करत आहे की, महाभारतामधील समय टाईप एखादं कॅरेक्टर बनून तिसऱ्या सीजनमध्ये येऊ. यावर मुलाखत घेणाऱ्यानं विचारलं की, मी अमर आहे तर यावर दिव्येंदू म्हणाला हो.
विज्ञानात एक उल्लेख आहे की, जगात फक्त 2 टक्के लोक असे आहेत ज्यांचं हृदय उजव्या बाजूला असतं. चाहत्यांचं म्हणणं आहे की, मुन्ना त्रिपाठी स्वत:ला अमर सांगतो. त्यामुळं मुन्नाच्या हृदयावर गोळी लागली नाही आणि तो परत येण्याची शक्यता आहे.
मिर्झापूर या वेब सीरिजबद्दल बोलायचं झालं तर गुरमीत सिंह आणि मिहिर देसाई यांनी या सीरिजचं डायरेक्शन केलं आहे.