इस्लामाबाद : बहुजननामा ऑनलाइन – आजकाल अनेकांना टिक टॉक व्हिडिओचे फॅडच लागले आहे. पाकिस्तानमध्ये अश्याच व्हिडीओमुळे दोन मुली इंटरनेट सेन्सेशन बनल्या आहेत. हरीम शाह आणि सुंदर खटक नावाच्या दोन मुली टिक टॉकवर पाकिस्तानच्या मोठ्या सेलिब्रिटींसह व्हिडिओ बनवून चर्चेत आल्या आहेत. या मुलींनी पाकिस्तानच्या पंतप्रधान ते परराष्ट्रमंत्र्यांपर्यंत प्रत्येकासह आपले टिक टॉक व्हिडिओ शेअर केले आहेत. हरीम आणि सुंदल अनेकदा फसवून राजकारण्यांसोबत टिक टॉक व्हिडिओ बनवतात, ज्याचा त्यांनाही अंदाज नसतो. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतचे त्याचे टिक टॉक व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. या मुली ज्यांना भेटणे कठीण आहे अशा राजकारण्यांसह टिक टॉक व्हिडिओ कसे बनवित आहेत. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी झालेल्या संभाषणात हरीमने सांगितले की, त्याने मनोरंजनासाठी टिक टॉक व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अशा प्रभावशाली राजकारणी लोकांपर्यंत कसे पोहोचतात, असे विचारले असता, हरीम म्हणाले, “मी तेहरीक-ए-इंसाफ, या पाकिस्तानच्या राजकीय पक्षाची खूप मोठी समर्थक आहे आणि मी पक्षाशी संबंधित आहे. त्यामुळेच मला पीटीआयच्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळते आणि मी त्यांच्याबरोबर टिक टॉक व्हिडिओ बनविते.” सुंदल म्हणाली, मी माझा पहिला व्हिडिओ पीटीआय नेते आणि पंजाबमधील मंत्री फैयाज-उल-हसन चौहान यांच्यासमवेत बनविला आणि मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा व्हिडिओ कोणत्याही योजनेशिवाय बनविला गेला आहे. आम्ही एका गंभीर विषयावर त्यांना भेटायला गेलो आणि मग आम्ही अचानक टिक टॉक व्हिडिओ बनवण्याचा विचार केला.
तसेच नेहमीच अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणार्या पाकचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनाही या मुलींनी चकमा देत टिक टॉक व्हिडिओ बनविला. रेल्वे मंत्री फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत पण या मुलीने त्यांना भूलवून टिक टॉक विडिओ बनविला आहे. ते फक्त राजकारणीच नाहीत तर ते क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींपर्यंत पोहोचतात आणि त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवून अपलोड करतात. टिक टॉक सेलिब्रिटी बनलेली हरीम म्हणाली की, तिला आपल्या देशातील सर्व प्रभावी नेत्यांसमवेत टिक टॉक व्हिडिओ बनवायचा आहे. तिला बिलावल भुट्टो यांच्यासमवेत व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचीही इच्छा आहे.
मात्र, ही छायाचित्रे उघडकीस येताच विरोधी पक्षनेते इम्रान खान आणि इतर नेत्यांवर निशाणा साधत आहेत. एका पीपीपीच्या सदस्याने हे फोटो शेअर करत त्याला लज्जास्पद म्हटले आहे. यावर हरीम यांनीही प्रत्युत्तर देत लिहिले, जे लोक स्वतः चुकीच्या मार्गावर गेले आहेत, ते लोक स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंध चुकीचे म्हणून पाहतात. मी पीटीआय कार्यकर्ता , मॉडेल, व्ही-लॉगर आणि एक्टिविस्ट आहे. आतापासून कुठल्याही नेत्याला लाजण्याची गरज नाही. या मुली गंभीर असणाऱ्या राजकारण्यांसोबत टिक-टॉक व्हिडिओ बनवून खूप प्रसिद्ध झाल्या आहेत.