नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश सोडून पळणाऱ्या बाबा नित्यानंद यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे. यामध्ये नित्यानंद म्हणतात की, मला कोणीही पकडू शकत नाही, मीच परम शिव आहे. तसेच ते म्हणतात सर्व दुनिया माझ्या विरोधात परंतु तुम्ही येथे उपस्थित राहून माझ्याप्रती इमानदारी दाखवली आहे. आता मला कोणीही पकडू शकत नाही, मीच परम शिव आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी (६ डिसेंबर २०१९) बलात्काराच्या आरोपाखाली देश सोडून पळून गेलेल्या ‘स्वयंभू बाबा’ नित्यानंदचा पासपोर्ट रद्द केला. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नित्यानंदच्या नव्या पासपोर्टची याचिकादेखील फेटाळण्यात आली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सामायिक केली. त्याचबरोबर सरकारने हेही स्पष्ट केले की वेबसाइट तयार केल्याने राष्ट्र निर्माण होत नाही.
https://twitter.com/YippeekiYay_DH/status/1197818470349463552
नित्यानंदने दक्षिण अमेरिकेत ‘कैलासा’ नावाचा देश बनविला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान रवीशकुमार यांना विचारले गेले की नित्यानंदने ‘कैलासा’ नावाच्या वेबसाइटवर स्वत: च्या देशाची घोषणा केली आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ‘एखादी वेबसाइट तयार करण्यापेक्षा वेबसाइट सुरू करणे ही वेगळी गोष्ट आहे.’ याव्यतिरिक्त, ते म्हणाले की, मंत्रालयाने नित्यानंदांबद्दल परदेशात असलेल्या सर्व मिशन आणि पोस्टना सतर्क केले आहे. नित्यानंद यांना दुष्कर्म केल्याप्रकरणी देश सोडावा लागला होता. त्यानंतर इक्वाडोरच्या सरकारने नित्यानंद यांना आश्रय दिल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
Visit : bahujannama.com