बहुजननामा ऑनलाइन टीम – शिरुर तालुक्याच्या सणसवाडी येथील माथाडी कामगारांना हवेली तालुक्याच्या फुलगाव येथील एका कंपनीमध्ये गाड्या खाली करायच्या नाही, नाहीतर आम्हाला गाडीमागे पाच हजार रुपये द्यायचे अशी खंडणी मागून मारहाण केल्याची घटना घडली असल्याने लोणीकंद पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले असून सुनील वागस्कर, निलेश वागस्कर, रुपेश वागस्कर, गणेश वागस्कर, नकुल वागस्कर, योगेश वागस्कर व वैभव वागस्कर असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सणसवाडी येथील वेदांत इंटरप्रायजेस मार्फत फ्रीडमबर्ग फिल्डरेशन टेक्नोलोजी प्रायवेट लिमिटेड कंपनीत काम करणारा माथाडी कामगार दिलीप वावधाने हा याच्या ताब्यातील एम एच ०४ एफ डी २९७१ हा मालाने भरलेला कंटेनर घेऊन २९ जानेवारी रोजी फुलगाव येथील कंपनीच्या वेअर हाऊस गोडावूनच्या गेटवर गेला होता, दरम्यान या गेटवर अजून एक एम एच १२ एल टी ५३३४ हा कंटेनर आला या कंटेनरमध्ये सतीश शेळके व रोनित तांबे हे दोघे कामगार होते, दोन्ही कंटेनर वेअरहाउसच्या गेटमधून आतमध्ये जात असताना त्या ठिकाणी काही युवक एका कार व दोन दुचाक्यांवरून आले आणि त्यांनी कंटेनरमधील कामगारांना खाली ओढले आणि आलेल्या युवकांनी दिलीप वावधाने, सतीश शेळके व रोनित तांबे या तिघांना दमदाटी करत तिघांना त्यांच्या कार मध्ये जबरदस्तीने बसवून जवळील एका पेट्रोलपंपाच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये नेले यावेळी निलेश वागस्कर याने तुम्ही बाहेर गावच्या माथाडी कामगारांना इकडे गाड्या खाली करू न देण्यासाठी आम्हाला सुनील वागस्कर यांनी पाठवले आहे, तुम्ही येथे गाड्या खाली करू नका तुम्हाला येथे गाड्या खाली करायच्या असेल तर तुम्ही आम्हाला प्रत्येक गाडीमागे पाच हजार द्या तरच येथे गाड्या खाली करा अशी धमकी देत शिवीगाळ, दमदाटी करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, यावेळी तिघे कामगार घाबरून वेअर हाउस सामोरील कंटेनर जवळ पळून आले आणि कंटेनर घेऊन सणसवाडी येथे आले, त्यानंतर घडलेला सर्व प्रकार वेदांत इंटरप्रायजेसचे सुपरवायजर पांडुरंग वसेकर व कानिफ गव्हाणे यांनी सांगत शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार घेऊन लोणीकंद पोलीस स्टेशन गाठले, त्यांनतर माथाडी कामगार दिलीप सटवाजी वावधाने रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. खंडोबा बाजार परभणी यांनी याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने लोणीकंद पोलिसांनी सुनील वागस्कर, निलेश वागस्कर, रुपेश वागस्कर, गणेश वागस्कर, नकुल वागस्कर, योगेश वागस्कर, वैभव वागस्कर सर्व रा. फुलगाव ता. हवेली जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे खंडणी, शिवीगाळ, दमदाटी, मारहाण प्रकरणी दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहे.