बहुजननामा ऑनलाईन – लावणी नृत्यात संगीतावर ठेका धरणारी प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक ही समाज माध्यमावर अनेक चाहत्यांच्या संपर्कात असते. वाट बघतोय रिक्षावाला हे मानसीचे गाणे अगदी सर्व लोकांच्यात प्रसिद्ध झालं आहे. अनेकांच्या मनात हे सॉंग्स वाजत असत. तसेच मानसी आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटना ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तर आता एक युजरने अत्यंत उद्धट टिप्पणी मानसीच्या फोटोवर केलीय. यावरून आता ती प्रचंड संतापली आहे. या प्रकारावरून मानसीने त्या लाईव्ह द्वारे युझर्सला चांगलच झापलं आहे.
अनेक सेलेब्रिटीच्या मध्ये कंमेंट करणं जे युजर आपले भान विसरून असभ्य वर्तणुकीतून प्रतिक्रिया देत असतात. मात्र आता अभिनेत्री मानसी नाईक हिने त्या युझर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. तुम्ही मला बुधावर पेठेत कधी बघितले ? त्याच्या पोटापाण्यासाठी त्या काम करतात. बुधावर पेठेत काम करणा-या महिला मोठ्या धाडसाने मेहनत करतात, त्यांचे घर चालवण्यासाठी त्या छातीठोकुन प्रामाणिकपणे काम करतात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करुन दाखवा असे मानसीने कमेंट करणा-याला अशा कठोर शब्दात खडसावले आहे.
दरम्यान, पुढे मानसी नाईक म्हणते, बुधवार पेठेत काम करणा-या महिलांना देखील आदराने वागणुकीची आवश्यकता असल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वीच मानसी नाईक लग्नबंधनात अडकली आहे. बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिने लग्न केले आहे. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले होते. पण या नवीन कॉमेन्टवरून तिने त्या युझर्सला लाईव्ह माध्यमातून संचार घेतला आहे.