बहुजननामा ऑनलाइन टीम – भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1971 रोजी वाराणसीत झाला आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल केला आहे. एक अभिनेता ते नेता असा त्यांचा प्रवास आहे. ते 4 किलिमीटर शाळेत पायी जायचे आणि प्लॅटफॉर्मवर झोपायचे.
भोजपुरी सिनेमात नाव कमावल्यानंतर 2009 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आधी ते समाजवादी पार्टीत होते. 2010 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. यावर्षी त्यांना दुसऱ्यांदा मुलगी झाली आहे. त्यांनी सुरभी सोबत लग्न केलं. या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना मुलगी झाली आहे.
1999 मध्ये सिनेमात येण्यापूर्वीच त्यांनी राणी तिवारी सोबत लग्न केलं होतं. 13 वर्षे संसार केल्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर लॉकडाऊनच्या काळात 2020 मध्ये त्यांनी सुरभी तिवारी सोबत लग्न केलं. ती त्यांची सेक्रेटरी होती. सुरभी उत्तम गायिका देखील आहे.
मनोज तिवारी यांच्या मोठ्या मुलीचं नाव जिया आहे. तिची इच्छा होती की, वडिलांनी दुसरं लग्न करावं. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत मनोज यांनी काही खुलासे केले आहेत.
मनोज तिवारी म्हणाले, पहिली पत्नी राणी सोबत घटस्फोट होऊन 10 वर्षे पूर्ण झाली. परंत आजही आमच्या दोघांमध्ये संवाद कायम आहे. जियाची इच्छा होती की, मी दुसरं लग्न करावं. जिया आणि सुरभी चांगल्या मैत्रिणी आहेत.
मनोज यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाचं झालं तर ससुरा बडा पैसावाला हा त्यांचा पहिला सिनेमा होता. 2004 साली आलेल्या या सिनेमाला खूप यश मिळालं आणि हा सिनेमा सुपरहिट झाला. त्यानंतरही त्यांनी अशा अनेक सिनेमात काम केलं जे हिट झाले.