बहुजननामा ऑनलाईन – Manoj Prabhakar | भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी नेपाळ क्रिकेट संघाच्या (Nepal Cricket Team) प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने यासंदर्भात माहिती दिली आहे. मनोज प्रभाकर यांनी 15 डिसेंबर 2022 रोजी नेपाळ पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशननेसुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Manoj Prabhakar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जूनमध्ये स्वीकारला होता पदभार
मनोज प्रभाकर यांनी गेल्या जूनमध्ये नेपाळ क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची पुबुडू दासानायकेच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. दासानायके यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे नेपाळ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. प्रभाकर यांच्या देखरेखीखालील नेपाळ क्रिकेट संघाची कामगिरी मोठ्या प्रमाणात सुधारली होती. (Manoj Prabhakar )
Mr. Manoj Prabhakar has stepped down from his position of Nepal Men’s National Cricket Team’s Head Coach with immediate effect on 15th December 2022. CAN has accepted his resignation and wish him the best for his future. pic.twitter.com/qK3zaBoY6G
— CAN (@CricketNep) December 15, 2022
केनियाविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका जिंकली
नेपाळच्या संघाने नुकत्याच पार पडलेल्या केनियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-2 असा विजय मिळवला होता. याशिवाय नेपाळच्या संघाने एकदिवसीय मालिकेतही 3-0 असा एकतर्फी मालिका विजय मिळवला होता.
नेपाळच्या वनडे दर्जाला धोका
सध्या नेपाळ क्रिकेट संघावर वनडे दर्जा गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता मनोज प्रभाकर यांनी प्रशिक्षकपद सोडल्याने नेपाळचा संघ दुहेरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत नेपाळचा संघ कसा तग धरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनोज प्रभाकर यांची क्रिकेट कारकीर्द
मनोज प्रभाकर यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 1984 ते 1996 दरम्यान 39 कसोटी आणि 130
एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांना कोचिंगचा बराचसा अनुभव आहे.
यापूर्वी त्यांनी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या संघाच्या कोचिंगची जबाबदारी पार पाडली आहे.
2008 मध्ये ते दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक होते त्यावेळी दिल्लीने रणजी करंडक जिंकला होता.
Web Title :- Manoj Prabhakar | manoj prabhakar steps down as coach of nepal cricket team information given by the board
हे देखील वाचा :