बहुजननामा ऑनलाईन – Manasi Naik | मराठी अभिनेत्री मानसी नाईक ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यांमुळे ती लोकप्रिय झाली. मानसीनं अनेक मराठी चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकराल्या आहेत. पण गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळं जास्त चर्चेत आली आहे.लग्नाच्या एक वर्षानंतरच मानसीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. तिनं घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 2021 मध्ये मानसीनं बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली होती.त्यांच्या लग्नाचीही विशेष चर्चा झालेली. (Manasi Naik)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मानसी नाईकने नुकतंच तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने स्वतःलाच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं लिहिलंय आणि यासोबतच तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्याची गोड बातमी दिली. तिच्या नवीन येणाऱ्या हिंदी चित्रपटाचं नावं ‘सिफर असं आहे ’ ती पुढे म्हणते कि हा माझा पहिला हिंदी वेब शो आहे. यंदाचा माझा वाढदिवस अधिक स्पेशल झाला. शुभेच्छा असू द्या. ” माझ्या वाढदिवशीच माझ्या पहिल्या ‘सिफर’ या हिंदी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. असाच तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहूद्या”, असेही तिने यात म्हटले आहे. (Manasi Naik)
मानसी नाईकच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव सिफर असे आहे.
तिच्या या चित्रपटामधील भूमिकेबद्दल मानसी सांगते, ‘’सिफरचा अर्थ शून्य असा आहे,
एका अनाथ मुलीचा प्रवास यातून दाखवण्यात आला आहे.
याला सिफर का म्हटलं आहे, ते तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यावरच लक्षात येईल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विनोद वैद्य यांनी केले आहे. चैतन्य आणि दिपक पांडुरंग राणे हे निर्माते आहेत.
हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे.
मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे देखील अजून गुलदस्त्यात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Manasi Naik | actress manasi naik new start debut in hindi film share first look post on social media
हे देखील वाचा :
Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटना
Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट