बहुजननामा ऑनलाईन – जपानमध्ये एका व्यक्तीचे एक दोन नव्हे तर तब्बल 35 गर्लफ्रेंड असल्याचे समोर आले आहे. 36 वी गर्लफ्रेंड बनवण्याच्या विचारात असताना त्याच्याकडून एक चूक झाली अन् हे प्रकरण उघडकीस आले. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीने सर्व मुलींना आपला वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी असल्याचे सांगितले होते. तसेच त्याने या सर्व मुलींना लग्नाचे वचन दिले होते. हे प्रकरण देखील एका मनोरंजक मार्गाने उलगडले आहे. ही व्यक्ती आता जपानी रोमियो म्हणून प्रसिद्ध झाला असून सध्या त्याचे हे अनोखे व्यसन सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
तकाशी मियागावा (वय 39) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या 35 गर्लफ्रेंड्स आहेत, त्याला पहिल्या गर्लफ्रेंडने भेटवस्तू दिली. त्यानंतर त्याला भेटवस्तू घेण्याचा नाद लागला. त्यामुळे त्याने नवीन मुलींना इम्प्रेस करण्यास सुरूवात केली आणि असे करत करत त्याने 35 गर्लफ्रेंड्स पटवल्या. महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या जुन्या गर्लफ्रेंड्सपैकी एकीलाही कधीच सोडले नाही. तो सर्वांना एकत्र डेट करत असे. त्याने हे फक्त गिफ्ट मिळवण्यासाठी केले. पण यादरम्यान त्याच्या एका चुकीमुळे पोलखोल झाली. हा तरूण घरोघरी साहित्य टाकण्याचे पार्टटाईम करायचा. दरम्यान हा तरूण या सर्व मुलींना मार्केटींग कंपनीच्या माध्यमातूनच भेटला. आरोपीने एका गर्लफ्रेंडला सांगितले की त्याचा वाढदिवस 22 फेब्रुवारीला आहे, तर दुसर्याने सांगितले की त्याचा वाढदिवस जुलैमध्ये आहे. याशिवाय त्याने तिसरीला सांगितले की त्याचा वाढदिवस एप्रिलमध्ये आहे. त्याचा वाढदिवस प्रत्यक्षात 14 नोव्हेंबरला होतो. त्याने फक्त महागड्या भेटवस्तू मिळवण्यासाठी हे केले. ज्यावेळी त्याच्या 35 गर्लफ्रेंड्सपैकी एकीने त्याच्यावर संशय घेतला. तेंव्हा हा प्रकार उघड झाला. त्या मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरूंगात पाठविले आहे.