बहुजननामा ऑनलाईन – मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान गुरुवारी (ता.१२) रात्री नागिन डान्स करताना अचानक एकाचा मृत्यू झाला. गुरचरण ठाकूर असे मृताचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात दोन लोक नागीन गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
हे दोघे नृत्यात इतके मग्न झाले आहेत की त्यांना काय घडत आहे याचे भानही राहिले नाही. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नागीन या चित्रपटाच्या लोकप्रिय ट्यूनवर काही लोकांसह नाचत आहे. सर्व नृत्यात गुंतलेले असताना अचानक त्यातील एक जण जमिनीवर पडतो. प्रथम तिथे उपस्थित लोकांना असे वाटते की नृत्यामुळे तो कंटाळला असेल, म्हणून तो खाली पडला असावा.
जेव्हा जमलेल्यांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठलाच नाही. त्याचा मृ्त्यू झाल्याचे लक्षात येताच सर्वांना धक्का बसला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.