बहुजननामा ऑनलाईन – महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढणार आहे हे लक्षात घेऊन यावर जास्तच फोकस करण्याचे ठरवले आहे. त्यातच आता इलेक्ट्रिक कारसाठी सरकारकडूनही पाठबळ देण्यात येत आहे. यासाठी सरकारने लोकांनी जास्तीत जास्त कर खरेदी करावी म्हणून जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सर्वसामान्यांना कार खरेदी करता यावी यासाठी भारतात लवकरच ३ नवीन कार लॉंच करणार आहे.
कंपनीच्या पहिल्या तिमाहीर धोरण जाहीर करताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी या कारची घोषणा केली आहे. KUV100 चे ईलेक्ट्रिक व्हर्जन , eKUV100 या नावाने लॉंच करण्यात येणार आहे. हे तीन कार यावर्षीच्या आखेरपर्यंत लॉंच करणार असल्याची माहिती गोयंका यांनी दिली आहे.
२०२१ पर्यंत या कार बाजारात आणल्या जातील. फॉर्ड अॅस्पायरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला महिंद्राची बँज (कारचे महिंद्रा व्हेरियंट ) सह लॉंच करण्यात येईल. कंपनी पुढील तीन वर्षात एकूण १८००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भारतात ई – व्हर्टीओ इलेक्ट्रिक कारची विक्री महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी करत आहे. पुढील तीन वर्षात इलेक्ट्रिक कारवर कंपनी फोकस करणार आहे.